उत्तम अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये बस्तान बसवलेल्या नवाजचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आणि वादाला तोंड फुटले. त्याविषयी बोलताना नवाज म्हणाला की, ‘माझ्या आयुष्यातील संघर्षाच्या दिवसांविषयी मी सगळे प्रामाणिकपणे लिहिले. पण, त्यातही ‘त्या’ पाच पानांमध्ये उल्लेख केलेल्या गोष्टींविषयी मला खंत आहे. मी एखाद्याचे नाव घेऊन सत्य लिहिले ही माझी चूक झाली. आत्मचरित्रात मला कोणत्याही महिलेचे नाव घेण्याची गरज नव्हती हे माझ्या लक्षात आले.मी निहारिकाचा आदर करतो; तसेच इतर महिलांचाही आदर करतो. उलट, महिलांना आदराने वागवणे हे मी निहारिका कडूनच शिकलोय,’ अशी कबुलीही त्याने दिली. या पुस्तकात त्याने मॉडेल-अभिनेत्री निहारिका सिंह हिच्या सोबतच्या अफेअरविषयी लिहिले होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews